नाशिक- संचारबंदी आणि जिल्ह्याच्या सीमा बंद करण्याची घोषणा झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी रस्तेही बंद केले आहेत. येवला शहरातून येणारे सर्व महामार्ग, शहरांतर्गत रस्तेही बंद करण्यात आले आहेत. केवळ आदेश देऊन नागरिक ऐकत नसल्याने सरकार आणि पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत.
लॉकडाऊन : येवला शहरात येणारे प्रमुख रस्ते पोलिसांनी केले बंद
वाहतुकीवर नियत्रंण मिळवण्यासाठी नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या यांच्या वतीने बॅरिकेट्स व बाबूंच्या सहाय्याने येवला शहरात दाखल होणारे प्रमुख रस्ते बंद करण्यात आले आहेत.
वाहतुकीवर नियत्रंण मिळवण्यासाठी नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या यांच्या वतीने बॅरिकेट्स व बाबूंच्या सहाय्याने येवला शहरात दाखल होणारे प्रमुख रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसेच शहरातील मुख्य रस्त्यासह ग्रामीण भागाला जोडणारे अनेक रस्तेही बंद करुन योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
नागरिक किरकोळ कारणासाठी रस्त्यावरून विनाकारण गर्दी करत आहेत. पोलिसांनी लाठ्याकाठीचा प्रसाद देऊन सुद्धा नागरिक घरात बसण्यास तयार नसल्याने येवला प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.