महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लक्षणं लपवल्यामुळेच रुग्णसंख्येत वाढ; उपचारासाठी नागरिकांनी पुढे यावं

काही नागरिक हे अगदी शेवटच्या टप्प्यात माहिती देत असल्यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे. मात्र, आरोग्य कर्मचारी जिल्हा प्रशासन यासंदर्भात काम करत आहेत. तिथे येणाऱ्या अडचणी ही सोडवल्या जातायत मात्र नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे.

लक्षणं लपवल्यामुळेच रुग्णसंख्येत वाढ; उपचारासाठी नागरिकांनी पुढे यावं
लक्षणं लपवल्यामुळेच रुग्णसंख्येत वाढ; उपचारासाठी नागरिकांनी पुढे यावं

By

Published : Apr 25, 2020, 4:27 PM IST

नाशिक- मालेगावमध्ये जरी कोरोना ग्रस्तांची संख्या वाढत असली तरी आरोग्य विभागाकडून हे आटोक्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न सुरू आहेत. मात्र, मालेगावमधील नागरिक हे माहिती लपवत आहेत. त्यामुळे सर्व्हे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याच्या अडचणी येत आहेत. हे बघता नागरिकांनी स्वतः हून माहिती देणे गरजेचे आहे.

लक्षणं लपवल्यामुळेच रुग्णसंख्येत वाढ; उपचारासाठी नागरिकांनी पुढे यावं

काही नागरिक हे अगदी शेवटच्या टप्प्यात माहिती देत असल्यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे. मात्र, आरोग्य कर्मचारी जिल्हा प्रशासन यासंदर्भात काम करत आहेत. तिथे येणाऱ्या अडचणी ही सोडवल्या जातायत मात्र नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे.

ज्या नागरिकांना खोकला, ताप, सर्दी अशी लक्षणे आढळून आल्यास त्यांची माहिती न लपवता कोरोनाची मोफत चाचणी सरकारमार्फत केली जात आहे. ती चाचणी करावी. दुर्दैवाने शेवटच्या टप्प्यात पेशंट येतो आणि तो दगावतो अशा घटना होत असून नागरिकांनी वेळेत उपचार केल्यास संख्या कमी होईल आणि रुग्ण बरे होऊन घरी जातील, असे कृषीमंत्री दादा भुसे यांनी ईटीव्ही भारतला बोलताना सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details