महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 9, 2022, 1:13 PM IST

Updated : Dec 9, 2022, 1:21 PM IST

ETV Bharat / state

Case Of Sexual Assault : बापलेकीच्या नात्याला काळीमा! मुलीवर 7 वर्षे अत्याचार नराधन बापाला अटक

Nashik Crime: अंबड परिसरात बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना डीजीपीनगर भागात घडली असून वडिलांनीच मुलीवर 7 वर्षे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik Crime
Nashik Crime

नाशिक: बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना अंबड परिसरातील डीजीपीनगर भागात घडली असून वडिलांनीच मुलीवर सलग 7 वर्षे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित मुलीने तक्रार दिली आहे. त्यामुळे वडिलांवर बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोस्को) कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल: सन २०१६ ते २०२२ दरम्यान नराधम पित्याने पत्नी व मुले घरी कुणी नसल्याचा फायदा घेत मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले आहे. ही घटना कुणाला सांगितल्यास आपलीच बदनामी होईल, अशी धमकी दिली. मात्र वडिलांचा त्रास असह्य झाल्याने मोठ्या हिमतीने पीडित मुलीने वडिलांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

नराधम बापाला अटक: या प्रकरणी संशयित नराधम बापाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात अत्याचारासह, बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोस्को) कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस. पी. बिडकर करत आहेत.

Last Updated : Dec 9, 2022, 1:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details