महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकमध्ये पूर्व वैमनस्यातून टोळीने केला दोघांवर प्राणघातक हल्ला - two friends

जुने नाशिक भागातील तिवंधा चौक परिसरात चार त पाच जणांच्या टोळीने दोघा मित्रांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यामध्ये दोघे मित्र गंभीर जखमी झाले आहेत.

हल्ल्यानंतर झालेली तोडफोड

By

Published : Aug 1, 2019, 8:00 AM IST

नाशिक - जुने नाशिक भागातील तिवंधा चौक परिसरात चार त पाच जणांच्या टोळीने दोघा मित्रांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यामध्ये दोघे मित्र गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या घटनेमुळे शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असल्याचे दिसत आहे. तसेच स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुने नाशिक येथील तिवंधा चौक परिसरात राहणारे मित्र विराज जंगम आणि रोहित पेखळे हे रात्री जेवण करून घराबाहेरील कट्ट्यावर गप्पा मारत बसले होते. यावेळी आलेल्या चार ते पाच जणांच्या टोळक्याने चॉपर, लोखंडी गजाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. हल्ल्यामध्ये दोघे गंभीर झाले. तर घटनेनंतर संशयित तेथून फरार झाले. स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली व दोघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. हल्ला करणाऱ्यांमध्ये संशयित सौरभ मराठे, गणेश खैरे, अशोक खैरे, यश खैरे यांची नावे समोर आली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाल्याचे बोलले जात आहे. तर नाशिक पोलिसांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहरातील शंभरहून अधिक सराईत गुन्हेगारांवर तडीपारीच्या कारवाई केली आहे. तरी नाशिकमध्ये गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details