नाशिक -येथे होत असलेल्या 94व्या मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात आली आहे. ( 94th All India Marathi Sahitya Sammelan ) यात साहित्यवर्तुळासह, मनोरंजन क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये डॉ. रामदास भटकळ, ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, यांच्यासह अभिनेते दिलीप प्रभावळकर, खासदार आणि अभिनेता डॉ. अमोल कोल्हे, संजीव तांबे यांच्यासह अनेक मान्यवर व्यक्ती विविध कार्यक्रम परिसंवादात सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळे अनेक वर्षानी साहित्य-संस्कृतीची मेजवानी नाशिककरांना अनुभवता येणार आहे. ( 94th All India Marathi Sahitya Sammelan Program list Announced )
नाशिकच्या भुजबळ नॉलेज सिटी येथे 3 ते 5 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नाशिककरांना अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचे विचार ऐकण्यास मिळणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर प्रमुख पाहुणे ( Javed Akhtar Chief Guest in Sahitya Sammelan Nashik ) म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर माजी संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो, डॉ. सदानंद मोरे, किशोर कदम, वैभव जोशी, अच्युत पालव, सुबोध भावे, शफआत खान, डॉ. रामचंद्र देखणे, शुभांगीराजे गायकवाड, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हे विविध कार्यक्रमात कवी संमेलनात, परिसंवाद अशा विविध ठिकाणी उपस्थित राहणार आहे. ( Cele