नाशिक- शहर आणि जिल्हा परिसरातील आत्तापर्यंतच्या 60 कोरोना संशयितांचे अहवाल नकारात्मक 'निगेटिव्ह' आले आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना कक्षातील रुग्णांना घरी सोडल्यामुळे हा कक्ष रिकामा झाला आहे. त्यामुळे नाशिककरांसाठी ही एक आनंदाचीच बातमी आहे, असे म्हणावे लागेल.
नाशिककरांसाठी समाधानकारक बातमी, आत्तापर्यंतचे 60 कोरोना संशयित 'निगेटिव्ह' - नाशिक 60 कोरोना संशयित निगेटिव्ह
नाशिकमधील आत्तापर्यंतच्या 60 कोरोना संशयितांचे अहवाल नकारात्मक 'निगेटिव्ह' आले आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना कक्षातील रुग्णांना घरी सोडल्यामुळे हा कक्ष रिकामा झाला आहे. त्यामुळे नाशिककरांसाठी ही एक आनंदाचीच बातमी आहे, असे म्हणावे लागेल.
नाशिक
मात्र, असे असले तरी कोरोनाबाधित देशातून नाशिकमध्ये आलेल्या 311 'होम कॉरनटाईन' केलेल्या नागरिकांवर आरोग्य विभाग लक्ष ठेऊन आहे. तर आजपर्यंत 14 दिवसांचे सर्वेक्षण पूर्ण झालेल्या नागरिकांची संख्या 31 इतकी आहे.
कोरोना बाधित देशातून नाशिक मध्ये आलेल्या नागरीकांची संख्या..
यूएई 94
इटली 07
इराण 01
सौदी 03
जर्मनी 13
चीन 2
यूएसए 31
यूके 30
इतर 161