महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशकात १२ तासांत ५० कोरोनाबाधितांची भर, जिल्ह्याचा आकडा ६०० पार - नाशिक कोरोना अपडेट

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. यामध्ये आणखी ४९ कोरोनाबाधितांची भर पडली असून एकट्या मालेगावात कोरोनाबाधितांचा आकडा ४९७ वर पोहोचला आहे.

corona positive cases nashik  nashik corona update  malegaon corona update  maharashtra corona update  malegaon corona positive  मालेगाव कोरोना अपडेट  नाशिक कोरोना अपडेट  मालेगाव कोरोनाबाधितांची संख्या
नाशकात १२ तासांत ५० कोरोनाबाधितांची भर, जिल्ह्याचा आकडा ६०० पार

By

Published : May 9, 2020, 2:40 PM IST

नाशिक - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गेल्या १२ तासांत ५० जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडा ६०० वर पोहोचला असून चिंता व्यक्त केली जात आहे.

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. यामध्ये आणखी ४९ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. एकट्या मालेगावातील कोरोनाबाधितांचा आकडा ४९७ वर जाऊन पोहोचला आहे. तसेच आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच नाशिकच्या ग्रामीण भागात ६१, नाशिक शहरात ४५ कोरोनाचे रुग्ण असून आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ६२२ वर पोहोचला आहे. त्यापैकी ४६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

नाशिक ग्रामीणमधील कोरोनाबाधितांची आकडेवारी -

ठिकाण कोरोनाबाधितांची संख्या
नाशिक ग्रामीण ०८
चांदवड ०३
दिंडोरी ०१
निफाड ०४
नांदगाव ०२
येवला २५
सटाणा ०१
मालेगाव ग्रामीण ११

ABOUT THE AUTHOR

...view details