नाशिक - येथील जिल्हाधिकारी कार्यालयात भाजपचे शहरातील तिन्ही आमदार, महापौर यांची बैठक झाली. या बैठकीत शहरात अनावश्यक होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी आमदारांनी केली.
भाजपाच्या तिन्ही आमदारांचा 50 लाखांचा निधी भाजीविक्रेत्यांसाठी; मास्क, सॅनिटायजरसाठी करणार खर्च - कोरोना अपडेट्स
भाजीपाला घेताना ग्राहक भाजीपाला आणि फळांना हात लावतात. त्याने कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता असल्याने भाजीपालाचे पॅकेजिंग करून विकण्याच्या सूचना देण्याची मागणी करण्यात आली आहे. याकरता, राज्य सरकारने आमदार निधीतून ५० लाख रुपयांचा मास्क, सॅनिटायजर आणि अत्यावश्यक खर्च करण्याची परवानगी दिल्याची माहिती आमदार फरांदे यांनी दिली.
सध्या, भाजीपाला विक्रेते ठिकठिकाणी बसत असल्याने सर्वत्र गर्दी होऊ लागली आहे. भाजीपाला घेताना ग्राहक भाजीपाला आणि फळांना हात लावतात. त्याने कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता असल्याने भाजीपालाचे पॅकेजिंग करून विकण्याच्या सूचना देण्याची मागणी करण्यात आली आहे. याकरिता, राज्य सरकारने आमदार निधीतून ५० लाख रुपयांचा मास्क, सॅनिटायजर आणि अत्यावश्यक खर्च करण्याची परवानगी दिल्याची माहिती आमदार देवयानी फरांदे यांनी दिली.
सर्व अत्यावश्यक पावले उचलत असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनीही कमी संख्येने घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सोबतच नाशिक शहरात लवकरच चौकाचौकात जाऊन पॅकेजिंग भाजीपाला मिळणार असल्याचे देखील जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.