नाशिक(येवला) - जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेले येवल्यातील 5 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून या पाच रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये एका बाळाचाही समावेश आहे. या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे.
येवल्यातील 5 रुग्णांची कोरोनावर मात; लहान बाळाचाही समावेश
येवला शहरात 23 एप्रिलला पहिली कोरोनाबाधित महिला आढळली होती. याच महिलेच्या सुनेचे बारा दिवसांचे बाळ आणि मुलगी यांनाही कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांवर 26 एप्रिलपासून नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. गेले सोळा दिवस यशस्वी उपचार झाल्याने हे रूग्ण बरे झाले असून ते घरी परतले आहेत.
शहरात 23 एप्रिलला पहिली कोरोनाबाधित महिला आढळली होती. याच महिलेच्या सुनेचे बारा दिवसांचे बाळ आणि मुलगी यांनाही कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांवर 26 एप्रिलपासून नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. गेले सोळा दिवस यशस्वी उपचार झाल्याने 5 जण बरे झाले असून ते घरी परतले आहेत.
येवल्याच्या ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, तहसीलदार यांनी पुष्पगुच्छ देऊन कोरोनामुक्त झालेल्यांचे अभिनंदन केले. दरम्यान, मोठ्या प्रमाणात रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले असून येवल्यातील 65 जणांचे अहवाल काय येतात याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.