नाशिक - जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वणी येथे बसस्थानक परिसरात महिलेवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी मध्यरात्री १ वाजेदरम्यान घडली आहे. याप्रकरणी ४ संशयितांविरोधात वणी पोलीस स्थानकात बलात्कार व अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बलात्कार करून जीवे मारण्याची दिली धमकी -
नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील वणी गावात ४२ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना काल (बुधवारी) रात्री घडली आहे. पीडित महिला ही मेडिकलवर गेलेली होती. त्यानंतर बसस्थानक परिसरातील निर्मनुष्य असलेल्या भागात लघुशंकेला ही महिला गेल्यानंतर याच परिसरातील संशयितांनी जीवे मारण्याची धमकी देत या महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.