नाशिक- जोरदार पावसामुळे इगतपुरी येथील जुने गुलमोहराचे झाड कोसळले. यात चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
इगतपुरीत वदळी पावसामुळे झाड कोसळले, चार जण गंभीर जखमी - जखमी
इगतपुरी तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसात स्वामी समर्थ मंदिर परिसरातील जुने गुलमोहराचे झाड कोसळले. या घटनेत चार जण गंभीर जखमी झाले असून एका वृद्ध महिलेचा समावेश आहे.
इगतपुरी तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसात स्वामी समर्थ मंदिर परिसरातील जुने गुलमोहराचे झाड कोसळले. या घटनेत चार जण गंभीर जखमी झाले असून एका वृद्ध महिलेचा समावेश आहे. जखमींवर घोटी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याच ठिकाणी दर रविवारी आठवडे बाजार भरतो, पण सोमवारी बाजाराचा दिवस नसल्याने मोठी जीवितहानी टळली.
तसेच दुसरीकडे जोरदार पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील दरेवडी येथील भाम धरणाच्या बाधित कुटुंबांना बांधण्यात आलेल्या घरांची बिकट अवस्थता झाली आहे. याठिकाणी वादळी वाऱ्यामुळे घरांची पत्रे उडून गेल्याने 40 कुटुंबे उघड्यावर आली आहेत.