नाशिक- नाशिक पश्चिममधील शिवसेनेची बंडखोरी रोखून शिवसेनेची मनधरणी करण्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांना अपयश आले आहे. नाशिक पश्चिमची जागा भाजपला सोडल्याने भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. या मतदार संघात भाजपने घुसखोरी केल्याचे सांगत शिंदेच्या समर्थनार्थ शिवसेनचे महानगर प्रमुख, पालिकेतील विरोधी पक्षनेते आणि 36 नगरसेवकांनी आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंकडे आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे भाजप आमदार सीमा हिरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
नाशकात युतीत बिघाडी, 36 सेना नगरसेवकांचे राजीनामे - 36 शिवसेना नगरसेवकांचे राजीनामे
शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणारा नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपकडे गेल्याने अनेक शिवसैनिक नाराज होते. यातून नाशकातील 35 शिवसेनेच्या नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत.
बोलताना अजय बोरस्ते
36 नगरसेवकांसह 2 महानगर प्रमुख आणि 350 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे नाशिक पश्चिममध्ये सध्या राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. पश्चिम नाशिक मतदारसंघातून विलास शिंदे हे बहुमताने निवडूण येतील, असा विश्वास यावेळी अजय बोरस्ते यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - देशभरातील २० हजार एचएएल कर्मचारी बेमुदत संपावर
Last Updated : Oct 15, 2019, 5:47 PM IST