नाशिक- पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे पोलीस महासंचालक पद महाराष्ट्र दिनी जाहीर झाले. यात पोलीस हवालदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस निरीक्षक असे मिळून ३१ जणांना ही पदक प्रदान करण्यात आले.
नाशिकमध्ये महाराष्ट्र दिनी ३१ जणांना पोलीस महासंचालक पदक प्रदान
आचारसंहिता असल्याने हा कार्यक्रम नाशिक पोलीस आयुक्तालयात येथे पार पडला. सतत १५ वर्षे अभिलेख कामगिरी तसेच नक्षलग्रस्त विभागात खडतर कामगिरी करणारे पोलीस हवालदार, अधिकारी यांना सपत्नीक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते पोलीस महासंचालक पदक देऊन गौरविण्यात आले.

यावेळी नांगरे पाटील यांच्यासह पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, माधुरी कांगणे, पौर्णिमा चौगुले, अमोल तांबे यांच्यासह नाशिक पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे कुटुंब उपस्थित होते. दरम्यान पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी एका आयपीएस अधिकाऱ्यांनी लिहिलेली कविता वाचून पदक मिळालेल्यांना शुभेच्छा दिल्या. संजय सांगळे, सुनील बोडके, रुपेश काळे, दानिश मन्सूरी श्रीधर बाविस्कर यांना नक्षलग्रस्त विभागात कठीण व खडतर कामगिरीबद्दल विशेष सेवा पदक देण्यात आले.