नाशिक - शहरातील पंचवटी परिसरातील चिंचबण येथे दोन व्यक्तींनी एका व्यापाऱ्याकडून 21 लाख रुपयाची लुटल्याची धक्कादायक घडली आहे. पैसे लुटल्यानंतर भामटे फरार झाले आहेत. शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू असून घटनास्थळी पोलीस यंत्रणा दाखल झाली आहे
नाशकात व्यापाऱ्याला मारहाण करत 21 लाख रुपये लुटले.. घटनेने शहरात खळबळ - पंचवटी पोलिस
एक व्यापारी 21 लाख रुपयांनी भरलेली बॅग घेऊन पंचवटी परिसरातून जात होता. या व्यापाऱ्याच्या मागावर असलेल्या दोन भामट्यांनी गाडीला कट मारण्याच्या किरकोळ कारण पुढे करत व्यापाऱ्यांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली.
आज (सोमवारी) संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास शहरातील पंचवटी परिसरातील चिंचबण येथे हा धक्कादायक प्रकार घडला. एक व्यापारी 21 लाख रुपयांनी भरलेली बॅग घेऊन पंचवटी परिसरातून जात होता. या व्यापाऱ्याच्या मागावर असलेल्या दोन भामट्यांनी गाडीला कट मारण्याच्या किरकोळ कारण पुढे करत व्यापाऱ्यांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यानंतर गाडीची काच फोडून दोघांनी बॅग घेऊन पलायन केले.
घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहे.