नाशिक - बायोडिझेल गाडीमध्ये भरत असताना मोटरचा स्पार्क झाल्याने डिझेल टँकचा भडका होऊन एकाचा मृत्यू झाला. ही घटना चांदवड-जळगाव महामार्गाच्या जळगाव खुर्द येथे घडली. या स्फोटाचे वृत्त कळताच नांदगाव पोलीस आणि मनमाड अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.
बायोडिझेल टँकचा भडका होऊन २० वर्षीय तरुणाचा होरपळून मृत्यू - अग्निशमन दल
चांदवड-जळगाव महामार्गाच्या जळगाव खुर्द येथील रस्त्याचे काम चालू असताना पीडब्ल्यूडी ठेकेदाराने बायोडिझेल साठवून ठेवले. हे बायोडिझेल गाडीमध्ये भरत असताना मोटरचा स्पार्क होऊन डिझेल टँकचा भडका उडाला. या घटनेमध्ये कुंदन गंगाधर सानप हा डिझेल भरणाऱ्या व्यक्तीचा होरपळून जागीच मृत्यू झाला.
चांदवड-जळगाव महामार्गाच्या जळगाव खुर्द येथील रस्त्याचे काम चालू असताना पीडब्ल्यूडी ठेकेदाराने बायोडिझेल साठवून ठेवले. हे बायोडिझेल गाडीमध्ये भरत असताना मोटरचा स्पार्क होऊन डिझेल टँकचा भडका उडाला. या घटनेमध्ये कुंदन गंगाधर सानप (२०, रा. पिंपरखेड ता. नांदगाव) हा डिझेल भरणाऱ्या व्यक्तीचा होरपळून जागीच मृत्यू झाला.
यावेळी घटनास्थळीचा आजुबाजुचा परिसर पूर्णपणे जळून खाक झाला. याप्रकरणी नांदगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरू होते. घटनास्थळी मनमाड येथील अग्निशामक दल दाखल झाले होते.