नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील अधरवड येथील कातकरी वस्तीमध्ये आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास 20 वर्षीय युवतीची जमावाकडून हत्या करण्यात आली ( Young Woman Murdered In Nashik ) आहे. तसेच कातकरी कुटुंबांची घरेही जाळून टाकण्यात आली ( Houses Fired In Igatpuri ) आहे. या घटनेमुळे इगतपुरी तालुका हदरला आहे.
कालही झाला होता वाद :अधरवड येथील आदिवासी कातकरी वस्तीमध्ये शरद महादू वाघ हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांच्याशी बारशिंगवे येथील आदिवासी व्यक्तींशी जमिनीचा वाद आहे.
एकाच वेळी ४०-५० जणांनी केला हल्ला - याबाबत गेल्या काही दिवसांपासून याबाबत वाद सुरु आहेत. शुक्रवारी दुपारी या प्रकरणी बारशिंगवे भागातील 40 ते 50 जणांचे संतप्त टोळके लाठ्याकाठ्या आणि दांडके घेऊन कातकरी वस्तीत आले होते. स्थानिक पोलीस पाटील आणि रहिवाश्यांनी यावेळी मध्यस्थी करून वाद मिटवला.
पहाटेच्या सुमारास केला घात :मात्र आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास टोळक्यातील 15 ते 20 जणांनी वस्तीत प्रवेश करुन हाणामाऱ्या सुरु केल्या. यावेळी शरद वाघ यांच्यावर वार करत असतांना, न्यायडोंगरी ता. नांदगाव येथून आलेली त्यांची मेहुणी लक्ष्मी वय 20 ही मध्यस्थी करत वाद सोडवायला गेली. मात्र या दरम्यान तिच्या मानेवर वर्मी वार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
संतप्त टोळक्याने जाळली घरे - संतप्त टोळक्याने शरद महादू वाघ, शंकर ज्ञानेश्वर वाघ, अलका संजू वाघ या तीन कुटुंबाची घरे जाळून टाकली. या घटनेमुळे इगतपुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. घोटी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन तपासकार्य सुरु केले आहे. अद्याप हल्लेखोरांचे नावं समजू शकले नसून हल्लेखोरांना शोधण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केलीय.
अनेक दिवसांपासून होता वाद -या आदिवासी पाड्यावर विविध कारणाने नेहमीच वाद होत असतात. मात्र हा वाद अनेक दिवसांपासून होता असे स्थानिक सांगातात. या वादावरुन त्याचे पर्यवसान किरकोळ भांडणात होत असे. मात्र काल रात्रीची घटना मोठी होती. हाणामारीत एका युवतीचा मृत्यू झालाच. त्याचबरोबर जमावाने झोपड्या जाळून छप्परही हिरावून घेतले.
हेही वाचा : धक्कादायक..! पत्नीची लाकड्याच्या ढिगाऱ्यावर जिवंत जाळून हत्या; निर्दयी पतीला बेड्या