महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकच्या खाकुर्डीमध्ये विहीर खचून २ जणांचा मृत्यू - डॉक्टर

मालेगाव तालुक्यातील खाकुर्डी येथे विहिर खचून दोघांचा मृत्यू झाला आहे.

नाशकात विहीर खचून २ जणांचा मृत्यू

By

Published : Mar 21, 2019, 11:55 PM IST

नाशिक- मालेगाव तालुक्यातील खाकुर्डी येथे ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीभोवती मातीचा भराव टाकण्याचे काम सुरु होते. ते पाहण्यासाठी गेलेले दोघेजण मातीच्या ढिगार्‍याबरोबर विहिरीत पडले, माती खाली दबले गेल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली.

खाकुर्डी येथे ग्रामपंचायतीच्या 2 सार्वजनिक विहिरी असून त्यातील गावाजवळील एका विहिरी लगत मातीचा भराव टाकण्याचे काम सुरू होते. हे काम पाहण्यासाठी कठड्यावर दीपक केशव कासार (वय ४६ रा. खाकुर्डी)आणि समाधान हिरामण जाधव (वय ५० रा. खाकुर्डी) हे दोघे उभे होते. त्यावेळी अचानक मातीचा ढिगारा कोसळला. या ढिगाऱ्याबरोबर दोघांचा तोल गेला आणि ते विहिरीत पडले. त्यामुळे दोघेजण मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले.

नाशकात विहीर खचून २ जणांचा मृत्यू

ही माहिती गावकऱ्यांना मिळताच गावकऱ्यांनी स्थानिक पोलीस ठाणे आणि अग्निशामक दलाला माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले, तेव्हा गावकऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने मातीचा ढिगारा काढला. सुमारे २ ते ३ तासाच्या प्रयत्नानंतर दोन्ही व्यक्तींना बाहेर काढून मालेगाव शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. परंतु, तोपर्यंत उशीर झाल्याने डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.

ABOUT THE AUTHOR

...view details