नाशिक - सटाण्याच्या जायखेडा येथे कांदा चाळीला आग लागून सुमारे एक हजार क्विंटल कांदा जळून खाक झाला. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, या आगीत चाळीतील मोठ्या प्रमाणात साठवलेला कांदा जळाला. दरम्यान, ही आग नेमकी कोणत्या कारणाने लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज आहे.
कांदा चाळीत आग लागून एक हजार क्विटंल कांदा खाक; 12 लाखांचे नुकसान
सध्या कांद्याच्या भावात घसरण सुरू असल्यामुळे शेतकरी सोमनाथ ब्राह्मणकर यांनी पुढे चांगला भाव मिळेल या आशेवर कांदा चाळीत कांदा साठवून ठेवला होता. या चाळीत आज अचानक आग लागली. आगीत सोमनाथ यांचा तब्बल दहा ते बारा लाख रुपयांचा कांदा जळाला.
साठवलेल्या कांद्याला आग लागली...
सध्या कांद्याच्या भावात घसरण सुरू असल्यामुळे शेतकरी सोमनाथ ब्राह्मणकर यांनी पुढे चांगला भाव मिळेल या आशेवर कांदा चाळीत कांदा साठवून ठेवला होता. या चाळीत आज अचानक आग लागली. आगीत सोमनाथ यांचा तब्बल दहा ते बारा लाख रुपयांचा कांदा जळाला.
आधीच दुष्काळाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना अशा घटनांनी मोठ्ठे नुकसान सहन करावे लागते. कांदा चाळीत लागलेल्या आगीत नुकसान झालेले शेतकरी सोमनाथ यांना कर्ज कसे फेडावे हा जटील सवाल त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे.