नाशिक- रविवारी प्रजासत्ताक दिन आहे. या निमित्ताने शुक्रवारी शहरातील २६ शाळेतील तब्बल ११ हजार विद्यार्थ्यांनी एकत्रित येत राष्ट्रगीत सादर केले. शहराच्या पंचवटी येथील श्री. राम विद्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला शहरातील गणमान्य लोकांची उपस्थिती लाभली.
नाशकात ११ हजार विद्यार्थ्यांनी एकत्रित गायले राष्ट्रगीत - vishwas nagre patil at ram school
कार्येक्रमात राष्ट्रगीत सोबत विजयी विश्व तिरंगा प्यारा, खरा तो एकची धर्म, तू नव्या जगाची आशा, सर्व धर्म समभाव गीत, भारत हमको सबसे प्यारा हे, या गितांचे विद्यार्थ्यांनी सामूहिक सादरीकरण केले.
कार्येक्रमात राष्ट्रगीत सोबत विजयी विश्व तिरंगा प्यारा, खरा तो एकची धर्म, तू नव्या जगाची आशा, सर्व धर्म समभाव गीत, भारत हमको सबसे प्यारा हे, या गितांचे विद्यार्थ्यांनी सामुहिक सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गितांमुळे राष्ट्रभक्तीचे दर्शन घडले. विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्तीची गोडी लागावी यासाठी नगरसेवक गुरुमीत बग्गा दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करत असतात. कार्येक्रमाला पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती आणि शिक्षक उपस्थित होते.
हेही वाचा-नाशिकमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या बंदला अल्प प्रतिसाद