महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकमध्ये संचारबंदी उल्लंघनाचे १०१७ गुन्हे दाखल; अफवा पसरविणार्‍या २०० जणांना अटक - 1017 arrested breaking lockdown

संचारबंदी आणि अफवांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वेळोवेळी अटक केलेल्या आरोपींना बजावले होते. मात्र, आरोपी आदेशांची पायमल्ली करत होते. परिणामी, पोलिसानी आरोपींना अटक केले आहे.

corona rumors nashik
नाशिक पोलीस

By

Published : Apr 5, 2020, 5:35 PM IST

नाशिक- शहरात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या १०१७ नागरिकांवर शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. कोरोना विषाणूबाबत सोशल मीडियावर मोठया प्रमाणात अफवा पसरविल्या जात आहे. प्रशासनाने हा खोडसाळपणा गांभीर्याने घेतला असून अफवा पसरविणाऱ्या २०० व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे.

संचारबंदी आणि अफवांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वेळोवेळी अटक केलेल्या आरोपींना बजावले होते. मात्र, आरोपी आदेशांची पायमल्ली करत होते. परिणामी, पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. त्याचबरोबर, १ एप्रिल रोजी टिकटॉकव्दारे 'एप्रिल फूल' बनविणाऱ्या चौघांना देखील अटक करण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोनाविषयी अफवा पसरवणारे व्हिडिओ व्हायरल होत असल्याची बाब सायबर सेलच्या निदर्शनास आली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गेल्या १५ दिवसात अफवा पसरविणाऱ्या २०० जणांना अटक केली आहे. पोलिसांनी १३७ वाहने जप्त केली असून कायद्याचे उल्लंघन होईल, असे कोणतेही कृत्य खपून घेतले जाणार नाही, असा इशारा जिल्हा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा-नाशिकच्या शिक्षकाने बनवले सोशल डिस्टन्सिंगची आठवण करून देणारे "कोरोना कवच"

ABOUT THE AUTHOR

...view details