Nandurbar District Year Ender 2021 : सारंगखेड्यातील घोडे बाजारसह 'या' घडामोडींमुळे चर्चेत राहिला नंदुरबार जिल्हा
2021 या वर्षात अनेक घटना व घडामोडींनी नंदुरबार जिल्हा बातम्यांच्या मथळ्यांमध्ये राहिला. मावळत्या वर्षात लोक कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते तर नंदुरबार जिल्ह्यातील ( Nandurbar District Year Ender 2021 ) या वर्षातील महत्त्वाच्या घटना लक्ष वेधत होत्या. नंदुरबार जिल्ह्यातील मावळत्या वर्षातील महत्वाची घटना ( Important Events in the Year 2021 in Nandurbar district) म्हणजे सारंगखेड्यात दाखल झालेले कोट्यवधी रुपये किंमतीचे अश्व हे अश्व प्रेमींसाठी चांगली मेजवानी होती. कुपोषित बालकांसाठी शोध मोहीम राबवताना अवलंबलेली शोधकार्य पद्धत व प्रक्रियेबाबत नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांचे महिला व बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी कौतुक केले. "नंदुरबार पॅटर्न" ही प्रक्रिया दिनांक 15 ऑगस्ट, 2021 पासून संपूर्ण राज्यभर राबविण्यात येईल, असे सांगितले.
नंदुरबार जिल्हा 2021 या वर्षात अनेक घटना व घडामोडींनी बातम्यांच्या मथळ्यांमध्ये राहिला. मावळत्या वर्षात लोक कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते तर नंदुरबार जिल्ह्यातील ( Nandurbar District Year Ender 2021 ) या वर्षातील महत्त्वाच्या घटना लक्ष वेधत होत्या. नंदुरबार जिल्ह्यातील मावळत्या वर्षातील महत्वाची घटना ( Important Events in the Year 2021 in Nandurbar district) म्हणजे सारंगखेड्यात दाखल झालेले कोट्यवधी रुपये किंमतीचे अश्व हे अश्व शौकीनांसाठी चांगली मेजवानी होती. कुपोषित बालकांसाठी शोध मोहीम राबवताना अवलंबलेली शोधकार्य पद्धत व प्रक्रियेबाबत नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांचे महिला व बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी कौतुक केले. "नंदुरबार पॅटर्न" ही प्रक्रिया दिनांक 15 ऑगस्ट, 2021 पासून संपूर्ण राज्यभर राबविण्यात येईल, असे सांगितले.
- सारंगखेड्यात दाखल झाले महागडे घोडे, मालकांकडून विक्रीस नकार :सारंगखेडा यात्रा अश्व बाजारासाठी ( Horse Market Sarangkheda ) प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या प्रजातींच्या अश्वांची या ठिकाणी विक्री होत असते. यंदा "रावण" ( Five Crore Horse ) ने अश्व बाजाराचे लक्ष वेधून घेतले आहे. नाशिकहुन सारंगखेडा घोडे बाजारात पहिल्यांदाच आलेल्या "रावण" घोड्याचे मालक असद सैयद यांनी एकूण दहा घोडे विक्रीसाठी आणले होते. सर्वच दहाही घोडे देखणे व विशिष्ट आहेत. त्यांची किंमत देखील खूप महागडी ( Horse Price ) आहे. यातील "रावण" या घोड्याला पाच कोटी रुपयात मागितले आहे, असा दावा मालकाने केला. पण, मालकाने विक्रीस नकार दिला. अशातच अडीच कोटींचा परमवीर, दोन कोटींचा वारीस, दीड कोटींचा ॲलेक्स आणि बुलंद, असे किंमती अश्वांनी शौकीनांना भुरळ घालती.
- रेल्वे प्रवासात आई व बाळासाठी होणार सोयीचे देवरे दाम्पत्याने तयार केले 'बेबीबर्थ' :रेल्वे प्रवासादरम्यान एकाच बर्थवर आई व लहान बाळाला प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. दोन वर्षांपूर्वी नंदुरबार येथील एका दाम्पत्याने आपल्या लहान बालकाला घेऊन प्रवास करत असताना आईला मोठ्या प्रमाणावर अडचणी आल्या. त्यावर देवरे दाम्पत्याने संशोधन करत 'बेबीबर्थ'ची संकल्पना निर्माण केली. कोरोना काळात दाम्पत्याने घरात बसूनच बेबीबर्थ स्ट्रक्चर तयार केले व त्यावर सर्व बाबींचा विचारपूर्वक अभ्यास करून दाम्पत्याने बेबीबर्थ ( Baby Berth ) तयार केले.
- साडेतीनशे दशकापासून अंगणवाडी चालविणारा कार्यकर्ता महिलांचे काम करतोय पुरुष:अंगणवाडी म्हटले की आपल्या डोळ्यासमोर एकच चित्र उभे राहते त्यात एक अंगणवाडी सेविका एक मदतनीस लहान बालके व त्यांच्या माता असतात. मात्र, नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात शेवटच्या टोकालावर असलेल्या मानवा येथे गेल्या 35 वर्षांपासून करणसिंग वळवी हे अंगणवाडी कार्यकर्ता म्हणून आपले कर्तव्य अत्यंत चोखपणे बजावत आहेत. स्वतःच्या घरात व परिवारातील सदस्यांनी या अंगणवाडीत सेवा रुजून दिले आहे.
- साडेतीन जिल्ह्यापुरता पक्ष आणि तीन खासदारांवर पंतप्रधानांची स्वप्ने, सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर टीका :शरद पवार हे जानते नेते असून साडेतीन जिल्हा आणि साडे तीन खासदारांच्या त्यांच्या पक्षाला नेहमीच पंतप्रधान पदाचे स्वप्न पडतात, अशी टीका सदाभाऊ खोत ( Sadabhau Khot On Sharad Pawar ) यांनी नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना केली होती. मुळात शरद पवार आणि नवाब मलिकांनी हर्बल गांजाचा शोध लावला असून यातून त्यांच्या जावयाप्रमाणे शेतकरीही सधन होतील. म्हणूनच ते लागवडीच्या परवानगीची मागणी करणारे पत्र मी त्यांना दिल्याचे खोत यांनी सांगितले. हे सरकार गांजाडी असून यातील मंडळी हे गांजा फुकून कारभार करत असल्यानेच त्यांच्याकडून असे वारंवार बोलले जात असल्याचेही खोत म्हणाले.
- गवळी समाजातर्फे शेकडो वर्षांपासूनची 'सगर' उत्सव परंपरा कायम :संगणक आणि इंटरनेटच्या युगातही गवळी समाजातर्फे शेकडो वर्षांच्या सगर उत्सव पशुधन परंपरा आजही कायम आहे. म्हणून दरवर्षी दीपावली पाडवा व बलीप्रतिपदाच्या निमित्ताने मुक्या प्राण्यांचा सगर उत्सव नंदनगरीचे आकर्षण असते. सलग दोन वर्षांपासून कोरोनाच्या संक्रमणामुळे सगर उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. मात्र, यंदा सगर उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
- टाकाऊ वस्तूंपासून युवकाने बनविली तीन चाकी 'इलेक्ट्रिक कार' :इंधन दरवाढीचा भडका कायम असून नंदुरबार तालुक्यातील जयपूर येथील एका 26 वर्षीय युवकाने भंगार वस्तूंतील टाकाऊ साहित्य वापरून तीन चाकी इलेक्ट्रिक कार तयार ( Electric Car ) केली आहे. लिथियम बॅटरीचा वापर करून तयार केलेली ही कार ताशी 45 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने धावू शकते. ही कार एका चार्जमध्ये पन्नास किलोमीटर अंतर कापू शकते. यासाठी अत्यंत कमी खर्च येतो. सध्यास्थितीत वाढलेल्या इंधन दरवाढीवर उपाय शोधण्यासाठी युवकाने तीन चाकी इलेक्ट्रिक कार बनविली असल्याचे सांगितले.
- आदिवासी भागात लसीकरणाच्या जनजागृतीसाठी 'सोंगाड्या पार्टी'चा प्रभाव :नंदुरबार जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या टक्केवारीत वाढ व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आदिवासीबहुल भागात नागरिकांमध्ये मनोरंजनाची सर्वात लोकप्रिय असलेली लोककला म्हणून सोंगाड्या पार्टीची ( Songadya Party ) ओळख आहे. सोंगाड्या पार्टी हीच लोकप्रियता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाच्या वतीने या पार्टीच्या माध्यमातून कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती केली जात आहेत. यात जिल्हा प्रशासनात मोठ्या प्रमाणावर यशही आले.
- हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा - खासदार संजय राऊत :भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना फार गांभीर्याने घेऊ नये त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शिवसेना पिंजऱ्यातला वाघ असेलही पिंजर्याचे दार उघडे ठेवले आहे. हिंमत असेल तर पिंजऱ्यात येऊन वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा, असे म्हणत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा ( Sanjay Raut On Chandrakant Patil ) साधला. खासदार संजय राऊत हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
- रोग पडल्याने शेतकऱ्यांनी पपई तोडून फेकली :शहादा तालुक्यातील रायखेड येथील पपई उत्पादक शेतकऱ्यांनी पपईवर मोझाईक रोगाचा ( Mosaic Disease on Papaya ) प्रादुर्भाव वाढल्यामुळे काढणीसाठी आलेली पपई शेतकऱ्यांनी तोडून फेकली. यात शेतकऱ्यांची लाखो रुपयांचे नुकसान झाले.
- महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागात अज्ञातांकडून गोळीबार एक जण जखमी :महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागात असलेल्या लक्कडकोट येथे रात्रीच्या सुमारास गुजरात राज्यातून एका कारमधून आलेल्या एकाने हॉटेल चलाकास पार्सल आहे का विचारत गोळीबार केली. यात हॉटेल चालक प्रवीण गावित हे जखमी झाले. गोळीबार करणारे दोघे घटनास्थळापासून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षकांसह मोठा फौजफाटा सीमावर्ती भागात तैनात करण्यात आला व नाकेबंद करण्यात आली होती.
- डोंगराळ व अतिदुर्गम भागात लसीकरणाच्या खडतर प्रवास :नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये चौका-चौकात कोरोना प्रतिबंधक लस अगदी सहज उपलब्ध होते. मात्र, नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेतील नर्मदा काठाच्या अतिदुर्गम आदिवासी गाव, पाड्यात लसीकरणासाठी ( Trouble For Vaccination ) खूप मेहनत घ्यावी लागते. दुर्गम भागातील वाड्या-पाड्या गाठण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना जीप, बोट, रुग्णवाहिका व त्यानंतर पायपीट करत लोकांच्या घरापर्यंत जाऊन अतिदुर्गम भागात लसीकरणासाठी प्रवास करावा लागतो.