महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये "महिला डिजिटल साक्षरता अभियान" कार्यशाळा संपन्न - महिला डिजिटल साक्षरता अभियान

नंदुरबार सारख्या जिल्ह्यांमध्येही महिला स्मार्ट आहेत, हे या कार्यशाळेत पाहायला मिळेल. स्मार्टफोन हा फक्त बिघडवत नाही तर घडवतो सुध्दा हे या कार्यशाळेच्या प्रशिक्षिका पल्लवी सोमवंशी यांनी महिलांना पटवून दिले.

nandurbar
नंदुरबारमध्ये "महिला डिजिटल साक्षरता अभियान" कार्यशाळा संपन्न

By

Published : Dec 21, 2019, 4:26 PM IST

Updated : Dec 21, 2019, 5:24 PM IST

नंदुरबार -विधी महाविद्यालय येथे "महिला डिजिटल साक्षरता अभियान"च्या अंतर्गत कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेला महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. नंदुरबार सारख्या जिल्ह्यांमध्येही महिला स्मार्ट आहेत, हे या कार्यशाळेत पाहायला मिळेल. स्मार्टफोन हा फक्त बिघडवत नाही तर घडवतो सुध्दा हे या कार्यळाळेच्या प्रशिक्षिका पल्लवी सोमवंशी यांनी महिलांना पटवून दिले. यावेळी सोमवंशी यांनी डिजिटल साक्षरता म्हणजे काय? त्यांची महिलांना काय गरज आहे? हे आपल्या अनोख्या शैलीमध्ये सर्व महिलांना शिकविले.

नंदुरबारमध्ये "महिला डिजिटल साक्षरता अभियान" कार्यशाळा संपन्न

हेही वाचा -नंदुरबार बाजार समितीत लाल मिरचीची आवक तेजीत, दोन महिन्यात तीस हजार क्विंटल खरेदी

अँड्रॉइड मोबाईलच्या माध्यमातून उमंग अ‌ॅपद्वारे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि एजन्सिजच्या ४४० सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असून त्याचा पुरेपूर फायदा कसा घ्यायचा, महिलांना अनेक अडचणींना संकटांना तोंड द्यावे लागते. त्यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या पाठीशी उभे असून आपल्या तक्रारीचे निवारण कसे करता येते. अशा वेगवेगळ्या सुविधा या अ‌ॅपवर कशा मिळवायच्या हे शिकविले. महिला सशक्तीकरण होण्यासाठी व महिलांचा वेळ, श्रम व पैसा वाचवून घर बसल्या महिला अनेक सुविधांचा फायदा कशाप्रकारे घेऊ शकतात. पुरुषांच्या तुलनेत आपणही मागे न राहता डिजिटल तंत्रज्ञान म्हणजेच स्मार्टफोनच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त फायदा घेऊन कुटुंबाला हातभार लावून कुटुंबाचा गावाचा व देशाचा विकास कसा करू शकतो. हे या कार्यशाळेतून महिलांना शिकण्यास मिळाले.

Last Updated : Dec 21, 2019, 5:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details