नंदुरबार - संपूर्ण जिल्हा हा दुष्काळाच्या झळा सोसत आहे. या जिल्ह्याला पावसाची अत्यंत गरज आहे. परंतु, जून महिना अर्धा उलटूनही पावसाने हजेरी लावलेली नाही. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार होत आहे. पण, पाऊस अजून आलेला नाही. मात्र, हवामान खात्याने पाऊस येईल असा अंदाज व्यक्त केल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नंदुरबारमध्ये अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा - कापूस
ज्या शेतकऱ्यांकडे थोड्याफार प्रमाणात पाण्याची सोय आहे त्यांनी मका,कापूस पीक लागवडीला सुरुवात केली आहे.
बळीराजाला अजूनही दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.
विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे थोड्याफार प्रमाणात पाण्याची सोय आहे त्यांनी मका,कापूस पीक लागवडीला सुरुवात केली आहे. उशिरा येणाऱ्या पावसामुळे शेवटच्या क्षणी पिके धोका देऊ शकतात. त्यामळे त्याच्याआधीच उपलब्ध असलेल्या पाण्याद्वारे शेती फुलवायला शेतकऱ्यांनी सुरू केली आहे.
बळीराजा शेती कसायला तयार आहे. म्हणून उशिरा का होईना पण चांगला पाऊस यावा, अपेक्षा धरत जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत.