महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवापूर मतदारसंघात रात्री उशिरापर्यंत सुरू होते मतदान - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९

नवापूर विधानसभा मतदारसंघातील मोठा कळवण या गावात रात्री उशिरापर्यंत मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून येत होते. रात्री ८ वाजून पंधरा मिनिटापर्यंत मतदान सुरू होते. मात्र, मतदार मतदान केंद्राच्या परिसरात असल्याने रात्री उशीरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती.

नवापूर मतदारसंघात रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू

By

Published : Oct 21, 2019, 11:32 PM IST

नंदुरबार - खानदेशातील नंदुरबार जिल्ह्यात एकूण ४ मतदारसंघांपैकी नवापूर या मतदारसंघात तिरंगी लढत आहे. यावेळी उमेदवार स्वत: मतदारांना मतदानाचे आवाहन करतानाचे चित्र पाहायला मिळाले. नवापूर तालुक्यातील मोठे कळवण येथे रात्री उशिरापर्यंत मतदानासाठी मोठी रांग लागली होती.

नवापूर मतदारसंघात रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू

नवापूर विधानसभा मतदारसंघातील मोठा कळवण या गावात रात्री उशिरापर्यंत मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून येत होते. रात्री ८ वाजून पंधरा मिनिटापर्यंत मतदान सुरू होते. मात्र, मतदार मतदान केंद्राच्या परिसरात असल्याने रात्री उशीरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती.

हेही वाचा - नंदुरबार जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर उत्साहात मतदान

नवापूर मतदारसंघात तिरंगी लढत आहे, त्यात खासदार माणिकराव गावित यांचे सुपुत्र भरत गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली. तर, विद्यमान आमदार सुरुपसिंग नाईक यांचे सुपुत्र शिरीष कुमार नाईक यांनी काँग्रेसमधून उमेदवारी केली आहे. नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांचे लहान बंधू शरद गावित यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी केली आहे.

हेही वाचा - मतदानासाठी जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी; 1,385 मतदान केंद्रांवर पार पडणार मतदान

अत्यंत चुरशीच्या या लढतीत मतदार कोणाच्या बाजूने उभा राहतो, याकडे साऱ्या जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. यासाठी पक्षाचे कार्यकर्ते मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी व मतदान करण्यासाठी आवाहन करत होते. तालुक्यातील कळवण, मोठे कळवण येथे मतदारांचा रात्री उशिरापर्यंत मतदानासाठी उत्साह कायम होता.

हेही वाचा - राज्यातील पहिला मतदार गुजरातचा रहिवासी, आयोगाचा भोंगळ कारभार

ABOUT THE AUTHOR

...view details