जिल्ह्यात खासगी रुग्णालयात लसीकरण सुरू; वयोवृद्ध नागरिकांचा प्रतिसाद - Vaccination begins in Nandurbar district
जिल्ह्यात खासगी रुग्मालयात लसीकरणाला सुरूवात झाली आहे. खासगी रुग्णालयात वयोवृद्ध नागरिक लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहेत.
जिल्ह्यात खासगी रुग्णालयात लसीकरण सुरू; वयोवृद्ध नागरिकांचा प्रतिसाद
By
Published : Mar 6, 2021, 3:44 PM IST
|
Updated : Mar 6, 2021, 3:54 PM IST
नंदुरबार - जिल्ह्यात आजपासून खासगी रुग्णालयात लसीकरणाला शुभारंभ करण्यात आला. त्यासाठी जिल्ह्यात दोन खासगी दवाखान्यांना मान्यता देण्यात आली आहे. नंदुरबारातील स्मित मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये लसीकरणाला शुभारंभ झाला. जिल्ह्यात सात ठिकाणी मोफत लसीकरण केंद्रांवर लस दिली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिली.
जिल्ह्यात खासगी रुग्णालयात लसीकरण सुरू; वयोवृद्ध नागरिकांचा प्रतिसाद
जिल्ह्यात खाजगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाच्या शुभारंभ प्रसंगी अनेक वयोवृद्ध नागरिकांनी गर्दी केली. याप्रसंगी नंदुरबार येथील स्मित मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये व्हॅक्सिनेशनसाठी लागणारी सर्व सुविधा उपलब्ध असल्यामुळे लसीकरण सुरू करण्यात आले. शासनाच्या मान्यतेनुसार दररोज शंभर नागरिकांना लसीकरण केले जाईल अशी माहिती खासगी रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
जिल्ह्यात दोन खासगी रुग्णालयात लसीकरण -
जिल्ह्यात दोन खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण करण्यात येणार आहे. त्यात नंदुरबार शहरातील स्मित मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल तर शहादा येथील सुश्रूत नर्सिंग होम येथे लसीकरण केले जाणार आहे.
जिल्ह्यात खासगी रुग्णालयात लसीकरण सुरू; वयोवृद्ध नागरिकांचा प्रतिसाद
खाकी लसीकरण केंद्र वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील -
जिल्ह्यात तुर्तास दोन ठिकाणी लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहे, त्यात नंदुरबार शहरात एक व शहादा येथे एक केंद्र उभारण्यात आले आहे. जिल्ह्यातील खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी लसीकरण केंद्र उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आव्हान जिल्हा अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी केले आहे.
वयोवृद्ध नागरिकांसह इतरांना दिली जाणार लस -
६० वर्षावरील सर्व नागरिकांना कोरोना लस मिळणार आहे. याशिवाय ४५ वर्षावरील परंतु गंभीर आजार असलेल्यांना लस दिली जाणार आहे. त्यासाठी संबधीत व्यक्तीला आजाराची कागदपत्र किवा दवाखान्याची फाईल सोबत घेऊन जाणे गरजेचे राहणार आहे.