नंदुरबार- शहादा तालुक्यातील पिंपळे गावाजवळील नाल्याला आज दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे नाल्याला पूर आला. त्या पुरात 2 बैल गाडीसह पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.
नंदुरबार : अचानक आलेल्या पुरामुळे नाल्यात बुडून 'सर्जा-राजा'चा मृत्यू - मृत्यू news
शहादा तालुक्यातील पिंपळे गावाजवळील नाल्याला आलेल्या पुरात बुडून 2 बैलांचा मृत्यू झाला आहे.
बैलांना वाचविण्याचे प्रयत्न करताना
येथील शेतकरी महादू आप्पा मराठे हे शेतात काम करत असताना अचानक नाल्याला पूर आला. त्यावेळी त्यांनी शेतातून नाल्याकडे धाव घेतली. त्यांनी गाडी आणि बैल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा प्रवाह एवढा जास्त असल्याने त्यांना बैलांना बाहेर काढता आले नाही. त्यामुळे सर्जा-राजाचा मृत्यू झाला. यावेळी शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाल्याने शेतकऱ्याने आक्रोश केला.