महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धनगर समाजाला अदिवासी समाजाच्या दिलेल्या सुविधाना विरोध - नंदुरबार

आदिवासींच्या सेवा सुविधा  धनगर समाजाला देण्यात येऊ नयेत मागणी आदिवासी समाजाने केली आहे. यामध्ये काँग्रेस पक्षाने पुढाकार घेत सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि राष्ट्रपतींकडे तक्रार करण्यात आली आहे.

धनगर समाजाला अदिवासी समाजाच्या दिलेल्या सुविधाना विरोध

By

Published : Mar 9, 2019, 9:25 AM IST


नंदुरबार - धनगर समाजाला आदिवासी प्रमाणे सेवा सुविधा देण्याच्या निर्णयाला नंदुरबार जिल्ह्यात प्रचंड विरोध होत आहे. नंदुरबार शहरात या निर्णयाविरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात हजारो आदिवासी बांधवांनी सहभाग नोंदवत, शासन निर्णयाचा विरोध नोंदवला. नंदुरबार शहरातील महाराणा प्रताप चौकापासून तर थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता.

धनगर समाजाला अदिवासी समाजाच्या दिलेल्या सुविधाना विरोध


आदिवासींच्या सेवा सुविधाधनगर समाजाला देण्यात येऊ नयेत मागणी आदिवासी समाजाने केली आहे. यामध्ये काँग्रेस पक्षाने पुढाकार घेत सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि राष्ट्रपतींकडे तक्रार करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यात नवापूर, खांडबारा, विसरवाडी या ठिकाणी बंदही पुकारण्यात आला होता. यामुळे सरकारचा हा निर्णय निवडणुकीच्या तोंडावर आदिवासी भागांमध्ये भाजपचा घात करेल असे दिसून येत आहे.


ABOUT THE AUTHOR

...view details