नंदुरबार- एकीकडे शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे, परंतु या वाहनांना मार्गक्रमण करण्यासाठी शहरातील रस्ते अरुंद होत चालले आहेत. त्यामुळे वाहतुकीचे नियम न पाळता वाहनचालक आपला मार्ग काढतात. त्यामुळे अपघातांची संख्या वाढत आहे. या बेशिस्तपणे वाहने चालवणाऱ्या वाहनचालकांवर जलदगतीने कारवाई करण्यासाठी शासनाद्वारे 'वन स्टेट वन चलन' या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील वाहतूक नियंत्रण शाखेला डिजिटल मशीन पुरवण्यात आल्या आहेत.
नंदुरबारमध्ये नियम मोडणाऱ्यांवर होणार जलदगतीने कारवाई; वाहतूक शाखेकडून डिजिटल मशीनचा वापर - कारवाई
वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी या डिजिटल प्रणालीचा वापर उपयोगात आणला असून या ऑनलाईन प्रणालीद्वारे कर्मचाऱ्यांचा वेळ वाचत आहे.
डिजिटल मशीन
वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी या डिजिटल प्रणालीचा वापर उपयोगात आणला असून या ऑनलाईन प्रणालीद्वारे कर्मचाऱ्यांचा वेळ वाचत आहे.
या डिजिटल प्रणालीद्वारे एटीएमद्वारेही दंड भरण्याची सुविधा आहे. तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांची माहिती आणि दंड भरल्याची माहिती एसएमएसद्वारे प्रादेशिक वाहतूक कार्यालयाला पाठवली जाते. या ऑनलाईन प्रणालीद्वारे बेशिस्तपणे चालवणाऱया वाहनचालकांवर आळा बसणार आहे, तसेच वाहतूक कर्मचाऱ्यांकडून अवैध वसुलीवर ब्रेक लागणार आहे.