महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्र ठेलारी महासंघाचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा - election

ठेलारी समाजाच्या मागण्या ७२ वर्षांपासून प्रलंबित असून, कुठल्याही पक्षाने  समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष दिले नसल्याचा आरोप ठेलारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शिवदास वाघमोडे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

पत्रराप परिषदेत बोलताना ठेलारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शिवदास वाघमोडे

By

Published : Apr 14, 2019, 2:37 PM IST

नंदुरबार - महाराष्ट्र ठेलारी महासंघाने उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. समाजाच्या मागण्या ७२ वर्षांपासून प्रलंबित असून, कुठल्याही पक्षाने समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष दिले नसल्याचा आरोप ठेलारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शिवदास वाघमोडे यांनी पत्रकार परिषदेत केला.

ठेलारी समाजाच्या मागण्या ७२ वर्षांपासून प्रलंबित असून, कुठल्याही पक्षाने समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष दिले नसल्याचा आरोप ठेलारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शिवदास वाघमोडे यांनी केला आहे.

ठेलारी समाजात ८५ टक्के अशिक्षीत लोक आहेत. हा समाज राणमाळात उघड्यावर राहतो. त्यामुळे वीज, पाणी, शिक्षण आणि घरकूल अशा मूलभूत सुविधा देखील त्यांना मिळत नाहीत. धुळे जिल्ह्यातील ६३ गावांमध्ये तर नंदुरबार जिल्ह्यातील १३४ गावात दोन लाखांहून अधिक ठेलारी समाज बांधव आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details