महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबारात जनावरांनाही दुष्काळाच्या झळा; चारा-पाण्यासाठी मेंढपाळांचे स्थलांतर

शासनाच्या योजनांपासून वंचित असलेला ठेलारी समाज मेंढ्यांच्या चारा-पाण्यासाठी दुष्काळात हतबल झाला आहे. निसर्गाचे चक्र असेच राहिले तर येत्या काळात ठेलारी समाजाला जगणे कठीण होईल. त्यामुळे या समाजासाठी शासनाने योग्य ते पाऊल उचलण्याची मागणी ठेलारी बांधवांनी केली आहे.

दुष्काळामुळे स्थलांतरीत झालेले मेंढपाळ

By

Published : Jun 10, 2019, 12:44 PM IST

Updated : Jun 10, 2019, 8:39 PM IST

नंदुरबार- जिल्ह्यात दुष्काळाने कहर केला आहे. माणसांसोबतच जनावरांनाही दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहे. त्यामुळे मेंढपाळ मेंढ्यांचा कळप घेऊन चारा आणि पाण्याच्या शोधात फिरत आहेत.

जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील रुंमली गावातील भटू सोनवणे आणि नाना गोयकर या मेंढपाळांनी चाऱ्यासाठी मेंढ्यांचा कळप घेऊन परिवारासह नवापूर तालुक्यातील केवडीपाडा गाव गाठले. मेंढपाळांनी या गावातील ईश्वर गावित यांच्या शेतातील भुईमूगचा चारा ८ हजार पाचशे रुपयाला विकत घेतला आहे, तर पाण्यासाठी ३ किलोमीटर लांब असलेल्या केवडीपाडा गावच्या धरणापर्यंत त्यांना पायपीट करावी लागत आहे. या शेतातला चारा संपत नाही तोपर्यंत ईश्वर गावित यांच्या शेतात त्यांचा थांबा असणार आहे. याठिकाणचा चारा संपल्यानंतर ते पुढच्या प्रवासाला निघणार आहेत.

शासनाच्या योजनांपासून वंचित असलेला ठेलारी समाज मेंढ्यांच्या चारा-पाण्यासाठी दुष्काळात हतबल झाला आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे मेंढपाळांचे जीवन कठीण होत चालले आहे. त्यांना परिवाराला घेऊन भरउन्हात चारा मिळेल तिथे उघड्यावर संसार मांडावा लागत आहे. रात्रीच्या वेळी तर अंधारात जमिनीवर झोपावे लागत आहे. तसेच मेंढ्यांसाठी रात्री जाळी लावून मेंढ्यांची राखण करावी लागते. उघड्यावरील या संसारामुळे लहान मुलांचे मात्र मोठे हाल होत आहेत. त्यामुळे या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.

शासनाच्या योजनांपासून वंचित असलेला ठेलारी समाज मेंढ्यांच्या चारा-पाण्यासाठी दुष्काळात हतबल झाला आहे. निसर्गाचे चक्र असेच राहिले तर येत्या काळात ठेलारी समाजाला जगणे कठीण होईल. त्यामुळे या समाजासाठी शासनाने योग्य ते पाऊल उचलण्याची मागणी ठेलारी बांधवांनी केली आहे.

Last Updated : Jun 10, 2019, 8:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details