महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'ईव्हीएम हटाव,लोकतंत्र बचाव आंदोलन' वंचितचे जिल्हाधिकारी कार्यालयावर घंटानाद

वंचित बहुजन आघाडी व संलग्नित संघटनांच्या वतीने सोमवारी ईव्हीएम यंत्रात घोटाळा झाल्याच्या आरोप करीत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घंटानाद आंदोलन करण्यात आले आहे. लोकसभा निवडणूक प्रक्रिया रद्द करून मतपत्रिके द्वारेच निवडणुका घेण्याची मागणी आंदोलकानी केली आहे.

By

Published : Jun 18, 2019, 12:21 AM IST

'ईव्हीएम हटाव,लोकतंत्र बचाव आंदोलन' वंचितचे जिल्हाधिकारी कार्यालयावर घंटानाद

नंदुरबार - वंचित बहुजन आघाडी व संलग्नित संघटनांच्या वतीने सोमवारी ईव्हीएम यंत्रात घोटाळा झाल्याच्या आरोप करीत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घंटानाद आंदोलन करण्यात आले आहे. लोकसभा निवडणूक प्रक्रिया रद्द करून मतपत्रिके द्वारेच निवडणुका घेण्याची मागणी आंदोलकानी केली आहे.
राज्यात 48 मतदार संघात मतगणना व निर्वाचन अधिकारी यांच्या मार्फत झालेल्या मतमोजणीच्या आकडेवारीत तफावत आहे. याबाबतीत निवडणूक आयोगाकडून लोकांच्या संभ्रम दूर होईल, अशा प्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

'ईव्हीएम हटाव,लोकतंत्र बचाव आंदोलन' वंचितचे जिल्हाधिकारी कार्यालयावर घंटानाद
निवडणुकीच्या पंधरा दिवसानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आयोगाला विचारणा केली होती. परंतु, त्यासंदर्भात अजूनही आयोगाकडून अपेक्षित उत्तर मिळालेले नाही.देशाची लोकशाही जिवंत रहावी म्हणून ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये देशभर जनआंदोलनाच्या माध्यमातून पक्षाच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. आगामी निवडणुका ह्या मत पत्रिकेद्वारेच घेण्यात याव्यात, यासाठी 'ईव्हीएम हटाव,लोकतंत्र बचाव आंदोलन' करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details