महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबारजवळ आढळला छिन्नविछिन्न अवस्थेतील अनोळखी महिलेचा मृतदेह - Nandurbar crime news

तरुणीचे शिर व धड वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याठिकाणी दाखल होवून परिसराची झाडाझडती घेतली. याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात कलम 302प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

unidentified woman murder
unidentified woman murder

By

Published : Aug 27, 2021, 6:44 PM IST

Updated : Aug 27, 2021, 7:07 PM IST

नंदुरबार - शहरानजीक असलेल्या नारायणपूर रस्त्यावर एका अनोळखी तरुणीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आल्याची घटना नंदुरबारात घडली. या तरुणीचे शिर व धड वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याठिकाणी दाखल होवून परिसराची झाडाझडती घेतली. याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात कलम 302प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून मृत तरुणी कोण, याचा पोलीस शोध घेत आहेत.

अनोळखी महिलेचा आढळला मृतदेह

नंदुरबार शहराला लागून असलेल्या नारायणपूर रस्त्यादरम्यान एका 25 ते 30 वयोगटातील अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळून आला. या तरुणीचे शिर व धड वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले आढळून आले आहे. तसेच तिचे हात शरीरापासून वेगळे आढळून आले.

अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध भादंवि कलम 302प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे, तसेच तीन वेगवेगळी पथके नेमण्यात आली आहेत.

श्वानपथकाची पाहणी

अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी श्‍वान पथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. परंतु मृत तरुणी कोण आहे व तिचा घातपात झाला आहे काय, असा संशय व्यक्त होत आहे. या घटनेबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. शहरानजीक तरुणीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळल्याने तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.

अधिकाऱ्यांकडूनही पाहणी

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, शहर पोलीस निरीक्षक अर्जुन पटले, उपनगरचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे घटनास्थळी दाखल झाले.

Last Updated : Aug 27, 2021, 7:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details