महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्ह्यात नवीन १० कोरोना रुग्ण आढळले; प्रशासनाची चिंता वाढली

नंदुरबार जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 78 वर पोहोचला आहे. 33 जण बरे होऊन घरी परतले आहेत. 38 रुग्ण नंदुरबार जिल्हा रुग्णालयात व 2 बाधित धुळे येथे उपचार घेत आहेत. 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Nandurbar Corona Update
नंदुरबार कोरोना अपडेट

By

Published : Jun 19, 2020, 10:51 AM IST

नंदुरबार-शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. 16 व 17 जून या दोन दिवस कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे जिल्हावासियांना दिलासा मिळाला होता. गुरुवारी एकाच दिवशी पुन्हा 10 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 78 वर पोहोचला. तर तळोद्यात एकाच वेळी कोरोना रुग्णाच्या संपर्कातील 7 जणांना कोरोनाची लागण झाल्याने तळोदा शहरात 23 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. नंदुरबारमध्ये 2, तळोद्यात 7 व शहाद्यात 1 असे एकूण 10 कोरोनाबाधित रुग्णांची एकाच दिवशी भर पडली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण मे महिन्याच्या अखेरीस बरे होऊन घरी परतत असल्याने जिल्हा ग्रीन झोनकडे वाटचाल करत होता. परंतु, जून महिन्याच्या सात तारखेनंतर मुंबईसह बाहेरगावाहून आलेल्या काही जणांना कोरोनाची लागण झाल्याने तेव्हापासून जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे.

या आठवड्यात 15 जूनपर्यंत कोरोनाचे नवे 31 रुग्ण आढळून आले होते. बुधवारी नंदुरबारातील एका 70 वर्षीय वृध्दाचा कोरोनामुळे बळी गेला आहे. 16 व 17 जून असे दोन दिवस कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह येत असल्याने दोन दिवसांपासून जिल्हावासियांना काहीसा दिलासा मिळत होता.

प्रशासनाला गुरुवारी 78 अहवाल प्राप्त झाले. एकाच दिवशी जिल्ह्यात तब्बल 10 जणांचे कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. यात नंदुरबारातील दोन, तळोद्यातील सात व शहाद्यातील एका रुग्णाचा समावेश असून नंदुरबार जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 78 वर पोहोचला आहे. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला असून 33 जण बरे होऊन घरी परतले आहेत. 38 रुग्ण नंदुरबार जिल्हा रुग्णालयात व दोन बाधित धुळे येथे उपचार घेत आहेत.

गुरुवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये नंदुरबारातील मन्यार मोहल्ला भागात 46 वर्षीय महिला व सिंधी कॉलनीतील 63 वर्षीय पुरुष, तळोद्यातील मोठा माळीवाड्यात 54 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय तरुणी, 45 वर्षीय महिला, 26 वर्षीय महिला, 39 वर्षीय महिला असे पाच रुग्ण तर काकाशेठ गल्लीत 35 वर्षीय पुरुष, शिवराम नगरात 51 वर्षीय पुरुष असे 7 रुग्ण तळोद्यात तर शहाद्यातील लोणखेडा येथे 64 वर्षीय महिला अशा दहा जणांना कोरोनाची एकाच दिवसाला लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. या बाधितांच्या संपर्कात आलेल्या नंदुरबारातील 10 जणांना क्वॉरंटाइन, तळोद्यातील 17 व्यक्तींना क्वॉरंटाइन असे एकूण 27 व्यक्तींना संपर्कात आल्यामुळे क्वॉरंटाइन केले असून त्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details