महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उत्तर महाराष्ट्राचे तापमान वाढले, पारा ४० अंशांवर - टोपी

उत्तर महाराष्ट्रात तापमान वाढले असून पारा ४० अंशावर पोहोचला आहे.

उत्तर महाराष्ट्रात तापमान वाढले

By

Published : Mar 28, 2019, 6:47 PM IST

नंदूरबार- जिल्ह्यात मार्च महिन्यात नागरिकांना मे हिटचा अनुभव मिळत आहे. सूर्य आग ओकत असून दुपारी रस्ते ओस पडू लागले आहेत. मागील २ दिवसांपासून तापमानात चांगलीच वाढ झाली असून पारा ४० अंशाच्या वर स्थिरावला आहे. याचा परिणाम जनजीवनावर होत आहे. दरम्यान, पुढील २ दिवसांत तापमानात आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

उत्तर महाराष्ट्रात तापमान वाढले

तापमानात २६ मार्चपासून वाढ झाली आहे. त्याचा परिणाम जनजीवनावर आणि शेतीवर होत असून सकाळी ११ वाजल्यापासूनच रस्ते ओस पडू लागलेत. तर दुसरीकडे शितपेयांच्या दुकानावर गर्दी दिसून येत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक छत्री, रुमाल, टोपी, गॉगल आदी साधनांचा उपयोग करीत आहेत. मात्र, दुपारी १२ वाजेपासून ते ४ वाजेपर्यंत शहरात अघोषित संचारबंदीसारखी परिस्थती पाहायला मिळत आहे.

उन्हात बाहेर निघताना काळजी घ्यावी - डॉ. राजेश दळवी

वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी बाहेर पडताना डोक्यावर रुमाल, टोपी, गॉगल या साधनांचा वापर करावा. सोबतच पाण्याची बॉटल ठेवावी. तसेच दुपारी काम नसेल तर बाहेर उन्हात निघणे टाळावे, असा सल्ला डॉ. राजेश दळवी यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details