महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सागवान लाकडासह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त; नंदुरबारच्या पिंपराण येथील कारवाई - पिंपराण सागवान लाकूड कारवाई न्यूज

साग वृक्षाचे लाकूड अतिशय महाग असते. हे लाकूड टिकाऊ असल्याने त्यापासून विविध वस्तू तयार केल्या जातात. त्यामुळे याला मोठी मागणी असते. नंदुरबारमध्ये वन विभागाने केलेल्या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात सागवान जप्त करण्यात आले आहे.

Teak
साग

By

Published : Nov 27, 2020, 3:19 PM IST

नंदुरबार - नवापूर तालुक्यातील पिंपराण येथे वनविभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून दोन लाख रुपयांचे सागवान लाकूड जप्त केले आहे. चिंचपाडा, नवापूर, नंदुरबार, खांडबारा येथील पथकाने ही संयुक्त कारवाई केली.

नवापूर तालुक्यातील पिंपराण येथील योहान प्रभू गावीत यांच्या शेतातील घरात मोठ्या प्रमाणात सागवान लाकूड असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे वनविभागाने चार पथकांसह गावीत यांच्या शेतातील घरावर छापा मारला. त्याठिकाणी रंधा मशीन व चिरकाम केलेले सागवान लाकून आढळले. हे लाकूड ताब्यात घेऊन करून शासकीय वाहनाने नवापूर आगारात जमा करण्यात आले.

जप्त केलेल्या सागवान लाकडासह कारवाई करणारे पथक

संयुक्त कारवाई -
वनक्षेत्रपाल चिंचपाडा, नवापूर, नंदुरबार, खांडबारा यांच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली आहे. या छाप्यात 275 सागवान लाकूड, एक पलंग, एक रंधा मशीन, इलेक्ट्रीक मोटारसह एक डिझाईन मशीन असा एकूण दोन लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे बेकायदेशीर सागवान लाकडाचे साहित्य बनविणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

अनेक ठिकाणी होते सागवानाची तस्करी -
नवापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये बेकायदेशीर सागवान लाकडापासून विविध वस्तू बनवण्याचे कारखाने सुरू आहेत. गेल्या दोन महिन्यात वनविभागाच्या पथकाने ठिकठिकाणी छापे टाकून अशा स्वरूपाच्या कारवाई केल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details