महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये राज्यस्तरीय फ्लोरबॉल स्पर्धेचे आयोजन; विजयी संघ करणार राज्याचे प्रतिनिधीत्व - floorball

राज्यस्तरीय शालेय फ्लोअरबॉल क्रीडा स्पर्धांचे नंदुरबार जिल्हा क्रीडा संकुलात उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये राज्यभरातील ८ भागातून १७ ते १९ वयोगटातील ३२ संघातून ४८० खेळाडू सहभागी झाले आहेत.

nandurbar
नंदुरबार येथे राज्यस्तरीय फ्लोअरबॉल स्पर्धेचे आयोजन

By

Published : Dec 22, 2019, 9:49 AM IST

नंदुरबार - राज्यस्तरीय शालेय फ्लोरबॉल क्रीडा स्पर्धांचे नंदुरबार जिल्हा क्रीडा संकुलात उद्घाटन करण्यात आले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार व नंदुरबार जिल्हा फ्लोरबॉल संघटना यांच्या वतीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

नंदुरबार येथे राज्यस्तरीय फ्लोरबॉल स्पर्धेचे आयोजन

या स्पर्धांमध्ये राज्यभरातील ८ भागातून १७ ते १९ वयोगटातील ३२ संघातून ४८० खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेतून विजयी संघ दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधीत्व करेल. या स्पर्धेचा थरार पाहण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थिती लावली होती.

हेही वाचा -नंदुरबारमध्ये बसची दुचाकीला धडक; 1 ठार

राज्यभरातून आलेले खेळाडू यात सहभागी झाले आहेत. या सर्व खेळाडूंची राहण्याची व खाण्याची व्यवस्था जिल्हा क्रीडा कार्यालय अधिकारी व जिल्हा संघटना यांच्या वतीने करण्यात आली आहे.

हेही वाचा - नंदुरबारमध्ये "महिला डिजिटल साक्षरता अभियान" कार्यशाळा संपन्न

ABOUT THE AUTHOR

...view details