नंदुरबार -जिल्ह्यात सर्वत्र झालेल्या समाधानकारक पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. ग्रामीण भागात पेरणीला वेग आला आहे. गेल्या तीन ते चार दिवसात पावसाने संपूर्ण जिल्ह्यात हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी कापूस लागवडीला सुरुवात केली आहे. तर ज्वारी, मका, सोयाबीन इतर पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांना बियाणे आणि खते उपलब्ध व्हावेत, त्यांच्या काळा बाजार होऊ नये, म्हणून भरारी पथकांची नेमणूक केली आहे.
जिल्ह्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस; कापूस लागवड वेग
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून समाधानकारक पाऊस झाल्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर शेतीच्या कामाला वेग आला आहे. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना बी बियाणे, खते व शेती उपयोगी साहित्य उपलब्ध व्हावे, यासाठी प्रशासना तर्फे उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून समाधानकारक पाऊस झाल्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर शेतीच्या कामाला वेग आला आहे. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना बी बियाणे, खते व शेती उपयोगी साहित्य उपलब्ध व्हावे, यासाठी प्रशासना तर्फे उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तर सध्या समाधानकारक पाऊस झाल्यामुळे कापूस लागवडीला वेग आला आहे.
शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी बनावट बियाणे विक्रेत्यांवर कृषी विभागाची कडवी नजर आहे. एकंदरीतच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता कापूस लागवडीला मोठ्या प्रमाणावर सुरुवात केली आहे. त्याचबरोबर ज्वारी, मका व सोयाबीन लागवड देखील काही भागात केली जात आहे. तर कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना बांधापर्यंत खते उपलब्ध केली जात आहेत. जेणेकरून लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांची हाल होणार नाही, म्हणून विशेष उपाययोजना केली जात आहे.