नंदुरबार - राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी लालपरी म्हणजेच राज्यभरात एसटी बसचा प्रवास थांबवला होता. मात्र, नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या आदेशावरून 22 मेपासून जिल्हाअंतर्गत बससेवा सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे महामंडळातर्फे संपूर्ण तयारी केली जात आहे.
नंदुरबारमध्ये उद्यापासून लालपरी धावणार रस्त्यावर - st bus
गेल्या दोन महिन्यांपासून लालपरी थांबली होती. मात्र, कोरोना विषाणूचा प्रभाव कमी झाला असेल, त्याठिकाणी एसटी बसेस सुरू कराव्यात, अशा सूचना राज्य शासनाने केल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी 22 मेपासून लालपरी रस्त्यावर धावणार असल्याचे सांगितले.
गेल्या दोन महिन्यांपासून लालपरी थांबली होती. मात्र, कोरोना विषाणूंच्या प्रभाव कमी झाला असेल, त्याठिकाणी एसटी बसेस सुरू कराव्यात, अशी सूचना शासनाने दिली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी 22 मेपासून लालपरी रस्त्यावर धावणार असल्याचे सांगितले. त्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने बसेसची सर्व्हिसिंग केली जात आहे. तसेच बसेसचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. खबरदारी म्हणून एका बसमध्ये फक्त 22 प्रवासी बसविले जातील, असे नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती आगारप्रमुख मनोज पवार यांनी दिली.