नंदुरबार - जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्ह्यातील सर्व दुकाने व पेट्रोल पंप 25 एप्रिलपर्यंत बंद राहतील. केवळ किराणा, दूध आणि भाजीपाला विक्री सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत सुरू राहील. रुग्णालये, औषधांची दुकाने, बँक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार सुरू राहतील, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील सर्व दुकाने, पेट्रोल पंप पुढील पाच दिवस बंद - जिल्हाधिकारी - नंदुरबार लॉकडाऊन
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्ह्यातील सर्व दुकाने व पेट्रोल पंप 25 एप्रिलपर्यंत बंद राहतील. केवळ किराणा, दूध आणि भाजीपाला विक्री सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत सुरू राहील.
कोरोनाबाधिताच्या कुटुंबातील तिघांना संसर्ग झाल्यामुळे जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झाले असून प्रशासनाच्यावतीने योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी वाहनाचा वापर करता येणार नाही. किराणा किंवा भाजीपाला आपल्या भागातील दुकानातूनच खरेदी करावा. अनावश्यक बाहेर फिरणे टाळावे. असे आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल. जीवनावश्यक सेवेशिवाय इतर कोणत्याही आस्थापना सुरू राहणार नाहीत. शासकीय कार्यालये 10 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहतील. तरी नागरिकांनी घरीच थांबावे, असे आव्हान जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.