नंदुरबार - नवस फेडून परतणार्या ठेलारी समाज बांधवांची चारचाकी उलटल्याने 30 ते 35 जण जखमी झाल्याची घटना भादवड गावानजिक घडली आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तिघांना पुढील उपचारासाठी धुळ्यात हालवण्यात आले आहे.
नवस फेडून परतणार्या भाविकांच्या वाहनाला अपघात: 30 जखमी; तीन गंभीर - नंदुरबार अपघात
नवस फेडून परतणार्या ठेलारी समाज बांधवांची चारचाकी उलटल्याने 30 ते 35 जण जखमी झाल्याची घटना भादवड गावानजिक घडली आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तिघांना पुढील उपचारासाठी धुळ्यात हालवण्यात आले आहे.
शिंदखेडा तालुक्यातील शेवाडे येथील ठेलारी समाज बांधव नवसपूर्तीसाठी नवापूर तालुक्यातील नवापाडाला गेले होते. यावेळी परतीच्या प्रवासादरम्यान संबंधित प्रकार समोर आला आहे. दरम्यान, भादवड गावानजीक वळणावर चालकाचे पिकअपवरील नियंत्रण सुटल्याने वाहन उलटून अपघात झाला. रात्री 9 वाजेच्या सुमारास अपघात झाल्याने अंधारात जखमींची आरडाओरड सुरू झाली. जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये देवबा चंदन ठेलारी, ताईबाई ठेलारी, मधुमा ठेलारी, बुदरबाई ठेलारी, काशिनाथ ठेलारी, राधाबाई ठेलारी, शिवा ठेलारी, गुलाब ठेलारी, बाबु ठेलारी, राचा ठेलारी, शारजाबाई उत्तम ठेलारी, रामदास ठेलारी, इंदूबाई ठेलारी, लग्ना ठेलारी, जंगुबाई ठेलारी, शंकर ठेलारी, नाबु ठेलारी, शितल ठेलारी, धुडूबा ठेलारी, कृष्णा ठेलारी, मंगळ ठेलारी, स्पेनाबाई ठेलारी, देवकाबाई ठेलारी, भोपाबाई ठेलारी, बाळाबाई काशिनाथ ठेलारी, बाबु ठेलारी, श्रावण ठेलारी, पिकअप चालक रविंद्र उद्धव व शिंपी हे जखमी झाले आहे.
तर केवळ काळू ठेलारी, देवबा चंदन ठेलारी (वय 7), काशिनाथ राघो ठेलारी हे तिघेही गंभीर जखमी झाल्याने पुढील उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले. नंदुरबार जिल्हा रुग्णालायात अपघातग्रतांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. जखमींमध्ये लहान बालकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.