नंदुरबार(तळोदा)- नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी ऊसतोड कामगार गुजरात राज्यात रोजगारासाठी स्थलांतरित होतात. सध्या लॉकडाऊनमुळे रोजगार नसल्याने मंगळवारी सकाळी गुजरातमधून तब्बल 900 ऊसतोड मजूर नंदुरबार जिल्ह्यात दाखल झाले. सोशल डिस्टन्स न राखता या सर्व मजूरांना ट्रक आणि टेम्पोत जनावरांप्रमाणे कोंबून आणले. त्यामुळे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
गुजरातमधून असंख्य ऊसतोड कामगार जिल्ह्यात दाखल ऊसतोड कामगार प्रकाशा येथे पोहचणार असल्याचे जिल्हा प्रशासनाला माहिती मिळाली. वरिष्ठ अधिकार्यांनी तत्काळ याची दखल घेत हालचाली केल्या. या सर्व मजूरांची आमलाड येथील विलगिकरण कक्षात प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून प्रशासन आता काय निर्णय घेणार? याकडे लक्ष लागून आहे.
दरवर्षी गुजरात राज्यात ऊसतोडणीसाठी सहकुटुंब हजारो मजूर नंदुरबार जिल्ह्यातून स्थलांतरित होत असतात. यंदा शहादा तालुक्यातील आणि तोरणमाळ भागातील मजूर गुजरात राज्यात गेले होते. हे मजूर परत आले आहेत. मात्र, गुजरातने त्यांची कोणतीही सोय न करता महाराष्ट्रात पाठवले की, हे मजूर स्वतः निघून आले हा संशोधनाचा विषय आहे. शहादा तालुक्यातील सिंध दिगर, तोरणमाळ, कुंडी पाळा, खडकी, झापी फलाई, कुंड्या भाद्दल, जुना व नवा तोरणमाळ या भागातील बहुसंख्य मजूर आहेत. यांना 14 दिवस होम क्वारंटाईनमध्ये ठेवणे गरजेचे आहे.
तळोदा तालुक्यातील ऊसतोड कामगारांची तपासणी आमलाड विलगिकरण कक्षात करण्यात आली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण, डॉ.विशाल चोधरी, एस.एस.वळवी, इरला गवळी, लीला साळवे, सुनंदा चोरे या आरोग्य सेविका, आरोग्य सहायक डी.बी.गवळी, आरोग्य सेवक जी.बी. बोरसे, मनोज पिंजारी, राहुल मालकर, विकास सुसर, आरोग्य सेवक हे तपासणी करत आहेत.