नंदुरबार- पावसाळा सुरू झाल्यानंतर जून महिना जवळपास कोरडा गेला. त्यानंतर जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावल्यावरही त्यात मोठा खंड पडत गेला. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचे सावट कायम होते. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात सर्वच भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर काही भागात समाधानकारक पावसाचे आगमन झाल्याने पेरणी केलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात दमदार पाऊस.. पिकांना जीवदान, शेतकऱ्यांमध्ये समाधान - मदत
गेल्या आठवड्यापासून नंदूरबार जिल्ह्यात सर्वच भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर काही भागात समाधानकारक पावसाचे आगमन झाल्याने पेरणी केलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे.
पुढचे दोन महिने पाऊस चांगला आला तर पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटू शकेल. मात्र, जून आणि जुलै महिन्यासारखीच परिस्थिती कायम राहिली तर दुष्काळी संकट येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पिकांची वाढ होण्यात मोठी मदत होत आहे.
तसेच या पावसामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही काही अंशी सुटला आहे. तसेच नदी नाल्यांच्या प्रवाहात वाढ होताना दिसत आहे. त्याचबरोबर धरणांच्या पाणी साठ्यात वाढ होताना दिसत आहे. मात्र, उशिरा झालेल्या पावसामुळे पिकांच्या उत्पादनात फेरबदल होण्याची शक्यता शेतकऱ्यांपुढे कायम आहे.