नंदुरबार - जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. नवापूर तालुक्यातील विसरवाडी जवळून वाहणाऱ्या सरपणी नदीला पूर आला आहे. तसेच नदी-नाल्यांना पूर आल्याने खेडे गावांना जोडणारा फरशी पूल वाहून गेला. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
नवापूरमधील सरपणी नदीवरील फरशी पूल गेला वाहून; अनेक गावांचा संपर्क तुटला - गावांना
सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे नवापूर तालुक्यातील विसरवाडी जवळून वाहणारी सरपणी नदीला पूर आला आहे. तसेच खेडे गावांना फरशी पूल वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला.
जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असल्याने सर्वदूर पाणीच पाणी झाले आहे. नवापुर तालुक्यातील डोंगराळ भागात मोठा पाऊस झाल्यामुळे, डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या ढोरपाडा गावातील धरण ओसंडून वाहत आहे. यामुळे सरपणी नदीला पूर आल्याने खेडे गावांना जोडणारा नदीवरील फरशी पूल वाहून गेला. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे
डोंगराळ भागातून पाण्याच्या प्रवाहाचा वेग अधिक असल्याने सरपणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.