नंदुरबार - जिल्हा रुग्णालयातील १५० खाटाच्या अद्यावत महिला रुग्णालय आणि अद्यावत अशा आरटीपीसीआर कोरोना टेस्टिंग लॅबचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. हिना गावित, जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी, आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड आदी मान्यवर उपस्थित होते.
नंदुरबारमध्ये अद्यावत महिला रुग्णालय आणि कोविड लॅबचे उद्घाटन
उत्तर महाराष्ट्रातील ही अत्याधूनिक अशी आरटीपीसीआर कोरोना टेस्टिंग लॅब असून या लॅबमध्ये एका दिवसाला १२०० टेस्ट करण्याची क्षमता आहे.
उत्तर महाराष्ट्रातील ही अत्याधूनिक अशी आरटीपीसीआर कोरोना टेस्टिंग लॅब असून या लॅबमध्ये एका दिवसाला १२०० टेस्ट करण्याची क्षमता आहे. कोरोना टेस्टमुळे जिल्ह्याला फायदा होणार आहे.
दुसरीकडे नंदुरबार सारख्या आदिवासी दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात महिला आणि बाल मृत्यू प्रमाण अधिक असल्याने या रुग्णालयामुळे फायदा होणार आहे. जिल्ह्यातील कुपोषण कमी करण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात विकास कामांना निधी कमी पडू देणार असे आश्वासन यावेळी दिले.