महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये घरफोडी करणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र प्रसारित; दोन दिवसात सव्वा दोन लाखांची घरफोडी

अंगावर शहारे येतील अशा प्रकारे चलाखीने घर फोडून सव्वा दोन लाखाचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. संबंधीत संशयित चोराचे रेखाचित्र पोलिसांनी रेखाटले आहे. संशयित आरोपी आपणास दिसून आल्यास त्वरित नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा व त्याबाबतची माहिती द्यावी असे अवाहन पोलिसांनी केले आहे.

roberry-in-nandurbar
नंदुरबारमध्ये घरफोडी करणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र प्रसारित

By

Published : Dec 3, 2019, 2:00 PM IST

नंदुरबार - अंगावर शहारे येतील अशा प्रकारे चलाखीने घर फोडून सव्वा दोन लाखाचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. संबंधीत संशयित चोराचे रेखाचित्र पोलिसांनी रेखाटले आहे. संशयित आरोपी आपणास दिसून आल्यास त्वरित नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा व त्याबाबतची माहिती द्यावी असे अवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा - फुल्ल ढोसून झोपले तळीराम गुरुजी; विद्यार्थ्यांची पाटी राहिली कोरी

नंदुरबार शहरातील शिवाजीनगर येथील प्लॉट नं. 39 अ वर राहणारे पृथ्वीराज जिजाबराव सावंत यांच्या घराचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी हातसफाई केली आहे. घरात शिरल्यावर कपाटातील 18 हजार रुपये किंमतीचे सोन्याच्या रिंगा, 15 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे ओमपान, 12 हजार रुपये किंमतीचे सोन्याचा तुकडा, 3600 रु. किंमतीचे चांदीच्या साखळ्या, 2400 रु. किंमतीचे चांदीचे बेले, 3 हजार रु. किंमतीचे चांदीची लक्ष्मीची मूर्ती, कपाटातील लॉकरमधील 55 हजाराची रोकड, 2 हजार रु. किंमतीच्या साड्या, 500 रु. किंमतीच्या खाकी ड्रेस असा एकूण 1 लाख 11 हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला आहे. घटनास्थळी ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर श्‍वान पथकाने चोरांचा माग घेण्याचा प्रयत्न केला.

शहरातून ज्ञानदीप सोसायटीत प्लॉट क्रं.52 वर राहणारे दगडू रेवा नागरे यांच्या घराचा मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. कपाटात ठेवलेले 21 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस तसेच 11 हजार रुपये रोख असा एकुण 74 हजाराचा मुद्देमाल चोरुन नेला. तर दुसरी घरफोडी याच कॉलनीतील रहिवाशी सतिश विश्‍वास पाटील यांच्याकडे झाली आहे. त्यांच्याही घराचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी 26 हजाराचा मुद्देमाल लांबविला आहे. कपाटात ठेवलेले 21 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागितने व 5 हजार रुपये रोख असा एकूण 26 हजाराचा मुद्देमाल चोरुन नेला.

याप्रकरणी पोलिसांनी शहरातील भुरट्या चोरांना पकडून त्यांची चौकशी केली असता आरोपीचा तपासून न लागल्यामुळे पोलिसांच्या चौकशीतून संशयित घरफोड्या करणाऱ्या आरोपीचे रेखाचित्र तयार करण्यात आले आहे. नंदुरबार शहर पोलिसांनी कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.आर. दिवटे व क्षीरसागर करीत आहे.

हेही वाचा - थर्डक्लास पक्षात जाऊन कारकीर्द संपवायची नाही; विश्वजीत राणेंचा सेनेवर घणाघात

ABOUT THE AUTHOR

...view details