नंदुरबार - शहरातील शिक्षित असलेला समाज संचारबंदीच्या काळात घराबाहेर पडू नये म्हणून जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना जनजागृती करावी लागते. तर, काहीवेळेस विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांच्या लाठीचां प्रसाद घ्यावा लागतो. मात्र, या उलट चित्र मोबाईल नेटवर्क मिळणे कठीण असलेल्या सातपुड्याच्या दुर्गम भागात आहे. अशा ठिकाणचे आदिवासी बांधव कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सज्ज आहेत. धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर दगड रचून रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असल्याचे दिसून येत आहे.
कोरोना इफेक्ट : अतिदुर्गम भागातील गावांना जोडणारे रस्ते बंद... रस्त्यात टाकले दगड
धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर दगड रचून रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असल्याचे दिसून येत आहे.
अतिदुर्गम भागातील गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर दगड रचून रस्ता वाहतुकसाठी बंद
दुर्गम भागात कोरोना विषयी जागृती करण्यासाठी स्थानिक बोलीभाषेत गाणी गाऊन माहिती दिली जात आहे. दुर्गम भागातील गावांमध्ये शहरी भागातून येणाऱ्या वाहनांवर बंदी करण्यात आली आहे. अतिदुर्गम भागातील गाव आणि पाड्यावर नागरिक कोरोनासोबत दोन हात करण्यास सज्ज झाले आहेत.