नंदुरबार (शहादा) - नंदुरबारमधील शहादा शहरात पहिल्यांदाच जगन्नाथ महाराज यांच्या रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शहरात प्रथमच होत असलेल्या या रथयात्रेचा भाविकांसह नागरिकांनीही आनंद लुटला.
रथयात्रेच्या भक्तिमय वातावरणात शहादाकर दंग, पहिल्यांदाच घेतला रथयात्रेचा अनुभव - भगवान श्री जगन्नाथ
नंदुरबारमधील शहादा शहरात पहिल्यांदाच 'नारायण भक्तीपथ'द्वारे 'भगवान श्री जगन्नाथ महाराज' यांच्या रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांसह नागरिकांनीही या भक्तिमय वातावरणाचा आनंद लुटला.
'श्री क्षेत्र नारायण पुरम, शहादा' या ठिकाणी भगवान जगन्नाथ यांचे भव्य मंदिर उभारले जात असून, गुरुवारी आषाढ शु. द्वितीया निमित्त शहादा शहरात प्रथमच 'नारायण भक्त परिवार' यांच्याकडून सप्तश्रुंगी मातेच्या मंदिरापासून श्री भगवान जगन्नाथ यांच्या भव्य रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
रथयात्रेचे महत्त्व लक्षात घेत परिसरातील भाविकांसह नागरिकांनीही यात मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. ढोल ताशांच्या गजरात लेझीम पथक, ध्वज पथक यांनीही आपली कर्तबगारी दाखवत रथयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांचा उत्साह द्विगुणित केला. शहादा शहरात प्रथमच श्री जगन्नाथ महाराज यांच्या रथयात्रेचे आयोजन केल्याने भाविकांसह नागरिकांनीही या भक्तिमय वातावरणाचा आनंद लुटला.