महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबार जिल्ह्यात बरसल्या पावसाच्या हलक्या सरी - visarvadi

नवापूर तालुक्यातील नवापूर परिसर, विसरवाडी, खांडबारा आणि जवळपासच्या गावांमध्ये सोमवारी पावसाने हजेरी लावली.

पावसाची हजेरी

By

Published : Jun 17, 2019, 11:46 PM IST

नंदुरबार - नवापूर तालुक्यातील नवापूर परिसर, विसरवाडी, खांडबारा आणि जवळपासच्या गावांमध्ये सोमवारी पावसाने हजेरी लावली. पावसाळा सुरू झाल्यापासून पावसाची ही दुसरीवेळ आहे. मात्र, खरीप हंगामासाठी पुरेशा प्रमाणात पाऊस झालेला नाही.

नंदुरबार जिल्ह्यात बरसल्या पावसाच्या हलक्या सरी
सोमवारी पाच वाजेच्या सुमारास नवापूर परिसर, विसरवाडी, खांडबारा आणि जवळपासच्या गावांमध्ये फक्त दहा मिनटे पाऊस पडला आहे. शेतीचे काम सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना दमदार पावसाची गरज आहे. वरुणराजा बळीराजावर कधी खुश होतो आणि दमदार पाऊस पाडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


या थोड्याशा पावसामुळे उकाड्याने हैराण नंदुरबारकरांना दिलासा मिळाला आहे. यानंतर मात्र मान्सूनच्या दमदार पावसाची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details