महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 15, 2020, 10:43 AM IST

ETV Bharat / state

पाया खोदताना आढळले पुरातन चांदीच्या नाण्यांनी भरलेले मडके

प्रकाशा येथे घर बांधकामासाठी खोदकाम करत असतांना काही पुरातन असलेली चांदीच्या नाण्यांनी भरलेले मडके निघाले. यावेळी ग्रामस्थांसह महसूल अधिकारी व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. महसूल कर्मचाऱ्यांनी नाणी ताब्यात घेतली.

silver coins were found in Nandurbar
नंदुरबारमध्ये चांदीच्या नाण्यांचे मडके आढळले

नंदुरबार- प्रकाशा येथे घर बांधकामासाठी खोदकाम करत असताना काही पुरातन असलेली चांदीच्या नाण्यांनी भरलेले मडके निघाले. चांदीचे नाणी निघाल्याची बातमी गावभर पसरल्याने अनेकांनी शांताबाई मोरेंच्या घराकडे धाव घेतली. यावेळी ग्रामस्थांसह महसूल अधिकारी व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर महसूल कर्मचाऱ्यांनी नाणी ताब्यात घेतली.

नंदुरबार तालुक्यातील प्रकाशा येथे घराचे बांधकाम करण्यासाठी खोदकामात करीत असताना इ.स.1862 ते 1888 दरम्यान काळातील असलेली पुरातन चांदीची शंभर नाणी सापडली. नाणी तपासणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय व पुरातन विभागाकडे पाठविण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी याच गावात पुरातन विहिर आढळून आली होती. आता पुरातन नाणी आढळल्याने नकाशा परिसरात आणखी काही पुरातन वस्तू सापडतील, असा अंदाज वर्तविला जात आहे. तापी नदीकाठी असलेल्या दक्षिणकाशी म्हणून ओळखले जाणारे प्रकाशा हे गाव शहादा तालुक्यात अंकलेश्‍वर-बर्‍हाणपुर मार्गालगत आहे. प्रकाशा गावात देवी-देवतांची पुरातन मंदिरे व वास्तु आहेत. या गावात यापूर्वीही पुरातन वस्तु व नाणी आढळून आल्या आहेत.

सोनारगल्लीजवळील शांताबाई कथ्थु मोरे यांनी घराचे बांधकाम सुरु केले आहे. या बांधकामासाठी मजुरांमार्फत खड्डे खोदण्याचे काम सुरु असतांना नेहमीप्रमाणे मजुर त्याठिकाणी खोदकाम करित होते. खोदकाम करित असतांना चांदीच्या नाण्यांनी भरलेली मडके सापडले. घटनास्थळी पोलिसांनी त्या ठिकाणी येवून पाहणी केली असता मडक्यांमध्ये इ.स.1862 ते 1866, 1888 या पुरातन काळातील शंभर पेक्षा अधिक नाणी मिळून आली. त्यावर पुरातन काळातील विक्टोरिया राणीचे चित्र असून दुसर्‍या बाजुला इंडियन रुपीज असे वर्णन केलेले आहे. एका नाण्याचे वजन 12 ग्रॅम असून एकुण 100 नाण्यांचे वजन 1 किलो 200 ग्रॅम आहे. ही नाणी पोलीस निरीक्षक कैलास माळी यांनी ताब्यात न घेता प्रकाशा महसूल मंडळाचे अधिकारी मुकेश चव्हाण, तलाठी धर्मा चौधरी, ग्रामसेवक बी.जी.पाटील यांच्या ताब्यात देवुन पुढील तपासणीसाठी नाणी व पुरातन विभागाकडे पाठविण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details