नंदुरबार -दिवसेंदिवस वातावरणात बदल होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखला नाही तर, भविष्यात सर्वांसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. यासाठी नंदुरबार येथे पर्यावरण प्रेमी आणि पर्यावरणासाठी विशेष कार्य करणाऱ्यांसाठी राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेचे आयोजन केले होते. निसर्गमित्र समिती व नंदुरबार तालुका विधायक समितीतर्फे या पर्यावरण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
नंदुरबार येथे राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेचे आयोजन
दिवसेंदिवस वातावरणात बदल होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखला नाही तर, भविष्यात सर्वांसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. यासाठी नंदुरबार येथे पर्यावरण प्रेमी आणि पर्यावरणासाठी विशेष कार्य करणाऱ्यांसाठी राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेचे आयोजन केले होते.
नंदुरबार येथे राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेचे आयोजन
या पर्यावरण परिषदेत पर्यावरणाच्या राष्ट्रीय उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी पर्यावरण प्रेमींचा सत्कार करण्यात आला. शेतीमध्ये विविध पद्धतीने पर्यावरण पूरक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचाही सन्मान करण्यात आला. समाजात पशुपक्ष्यांची जोपासना, वृक्ष लागवड, जल परिषद असे विविध उपक्रम राबवून जनसामान्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जनजागृती करणाऱ्या मंडळीचा निसर्ग मित्र समिती व नंदुरबार तालुका विधायक समिती तर्फे सत्कार करण्यात आला.